उषा मंगेशकर ग. दि. माडगूळकर बालगीत मराठी गाणी

Ek Kolha Bahu Bhukela Marathi Lyrics | एक कोल्हा बहु भुकेला

Ek Kolha Bahu Bhukela / एक कोल्हा बहु भुकेला

एक कोल्हा, बहु भुकेला, फार होता कावला
एक तुकडा परि न त्याला खावयासी गावला

बापड्याने जंगलाचा भाग सारा धुंडला
भर दुपारी तो बिचारा दीनवाणा हिंडला
शेवटाला थकून गेला सावलीला थांबला

उंच होते झाड त्याला उंच शेंडा कोवळा
बसून वरती खाऊ खाई एक काळा कावळा
चोचीमध्ये मांस धरुन चाखितो तो मासला

मारुनिया हाक त्यासी गोड कोल्हा बोलला,
“एक गाणे गा मजेने साद तुमचा चांगला
कोकिळेचे आप्त तुम्ही, घरीच त्यांच्या वाढला”

मूर्ख वेड्या कावळ्याने रागदारी मांडली
चोचीमधली चीज त्याच्या त्वरित खाली सांडली
धावला कोल्हा सुखाने घास त्याने सेविला

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: उषा मंगेशकर
गीत प्रकार: बालगीत

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा