Kalpanecha Kunchala / कल्पनेचा कुंचला स्वप्नरंगी
कल्पनेचा कुंचला, स्वप्नरंगी रंगला
चित्र मी काढू कसे? सजणा सांग ना !
हे निळेपण पांघरावे
गीत माझे मोहरावे
शब्द मी माळू कसे?
सजणा सांग ना, सांग ना !
खेळतो हा धुंद वारा
या धुक्याच्या शुभ्र धारा
रंग मी खेळू कसे?
सजणा सांग ना, सांग ना !
आज संध्या रूप घेई
प्रीतीचे मज दान देई
गुज मी बोलू कसे?
सजणा सांग ना, सांग ना !
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: उषा मंगेशकर
चित्रपट: जोतिबाचा नवस
गीत प्रकार: चित्रगीत