Gheun Roop Majhe / घेऊन रूप माझे
घेऊन रूप माझे ही रात्र गाऊ दे
नाथा, असेच आता मज धुंद राहू दे
वर्षाव का फुलांचा झाला नव्या प्रभाती
गंधात चिंब न्हाली माझी सुवर्णकांती
डोळ्यांपुढे मला ते सुख स्वप्न पाहू दे
मी आज यौवनाचे हे लाजवस्त्र ल्याले
दंव झेलता कळीचे अपसूक फूल झाले
देवा तुझ्याप्रती हे सर्वस्व वाहू दे
विजयात आज माझ्या शरणागती लपावी
ही ठेव संचिताची आजन्म मी जपावी
आलिंगनी तुझ्या या एकरूप होऊ दे
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: भास्कर चंदावरकर
स्वर: उषा मंगेशकर
चित्रपट: भक्त पुंडलिक
गीत प्रकार: चित्रगीत