Manala Zali Krushn / मनाला झाली कृष्ण
छुमछुम पायी वाजे घुंगुर
गिरकी घेता फिरते अंबर
ताल धिनक्धिन भिनला अंगी
गोपी भिजल्या हरीच्या रंगी
वेडी झाली राधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
यमुनेच्या त्या तीरावरती गोपी
अशा जलक्रीडा करिती
अवचित येता कृष्ण कन्हैय्या झाली त्रेधा त्रेधा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
नटखट कान्हा खोड्या करितो
फोडुनी मटका लोणी चोरितो
रागे भरिता गोड हासुनी लावितसे गोकुळ नादा
मनाला झाली कृष्ण सख्याची बाधा !
गीत : मनाला झाली कृष्ण
गीतकार : श्रीरंग गोडबोले
गायक : माधुरी कर्मकार
संगीत लेबल: Zee Music Marathi