उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Naka Todu Pavana Marathi Lyrics | नका तोडू पावणं

Naka Todu Pavana / नका तोडू पावणं

डेरेदार बहरलं झाड, लागला पाड
पानाच्या आड खुणवतो आंबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

अहो टोपीवालं तुम्ही फेटेवालं
टकमक टकमक बघू नका हो
मागं मागं लागू नका

भलत्याच गोष्टी करू नका
नका तोडू पावणं जरा थांबा

वाण अस्सल, तांबूस पिवळा
टचटचून रसानं भरला
हिरवट गोडी, आंबट थोडी
सालीत मऊमऊ गाभा
नका तोडू, पावणं जरा थांबा

भार देठाला सोसत न्हाई
आली झुळुक हेलकावा खाई
नजरा सावरा थोडक्यात आवरा
कईकांनी धरला दबा
नका तोडू, पावणं जरा थांबा

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: उषा मंगेशकर
चित्रपट: पिंजरा
गीत प्रकार: चित्रगीत, लावणी

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते