Aai Jagadambe / आई जगदंबे जगदंबे
आई तुझ्या ग चरणी
आभाळ धरनी येऊन विसावले
देवा दिकांचे संकट
जाये ग हरुनी तुझ्याच कृपेमुळे
नाद झंकार तू सारा संसार तू
नाद झंकार तू सारा संसार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे तू तपस्विनी
आई जगदंबे तू ओजस्विनी
आई जगदंबे तेज तेजस्विनी
आई जगदंबे जगदंबे
आई जगदंबे
आशेचा अंकुर दे
आई जगदंबे आई जगदंबे
तुझी छाया हि अंतरली
आई जगदंबे तू महेश्वरी
आई जगदंबे तू परमेश्वरी
आई जगदंबे दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे..
घाट घालू किती वाट पाहू किती
लाट मायेची होऊन ये
कणाकणात तू मनामनात तू
जिवाशिवात तू अंबे
धावा ऐकून भक्ताचा
आई हाकेला धावून ये,
ओढ साठली डोळ्यात
मन भेटीला आतुर हे,
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुला पाहू किती गुन गाऊ किती
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे तू तपस्विनी
आई जगदंबे तू ओजस्विनी
आई जगदंबे तेज तेजस्विनी
आई जगदंबे
जगदंबे आई जगदंबे
मायेची मखमल दे,
आई जगदंबे आई जगदंबे
दयेची दरवळ दे,
आई जगदंबे तू महेश्वरी
आई जगदंबे तू परमेश्वरी
आई जगदंबे दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे
पाप वणवा करी आग नजरेतली
महाकालीचे रूप निळे
दिव्य रूपे तुझी दंग दाही दिशा
तू क्रोधाने दैत्य जळे
देह होऊन गुलाल
तुझ्या दारात सांडू दे
साऱ्या जन्माची पुण्याई
तुझ्या पायाशी मांडू दे
कधी अंगार तू कधी शृंगार तू
कधी अंगार तू कधी शृंगार तू
तुझ्या पायाशी आम्हा राहू दे
आई जगदंबे तू महेश्वरी
आई जगदंबे तू परमेश्वरी,
आई जगदंबे दुर्गे दुर्गेश्वरी
आई जगदंबे.
गीत : आई जगदंबे
गीतकार : मंगेश कांगणे
गायक : आदर्श शिंदे
संगीत लेबल: Zee Music Marathi