Aabhala / आभाळा
आभाळा… आभाळा… आभाळा…
कसदार बीजापोटी कसा तरारला इळा
बांडगुळा पाई झाडं काढतं का गळा
आभाळा… आभाळा… आभाळा…
कापुराच्या काजळीची का धग देवळा रं
उगवला कसा काय सूर्य ह्यो जांभळा रं
ईपरीत घडतंया काळ ह्यो आंधळा
मातीचा का तुला न्हाई थांग आभाळा
कसं फेडू धरणीचं पांग आभाळा रं
आभाळा… आभाळा… आभाळा…
ढेकळात रुज हिथं हरेकाची नाळ रं
रगतात माती अंगी रग मायंदाळ रं
एक बुक्कीत फोडली गाठीची बाभळ
कुस्तीमंदी लोळवला मल्ल महाबळ
फाळावानी हात तुझा काळावाणी घाव
आता कुठं ठाव रं उष्टयासाठी धाव रं
आभाळा… आभाळा… आभाळा…
गीत :आभाळा आभाळा
गीतकार : प्रणित कुलकर्णी
गायक : सौरभ साळुंके, रवींद्र साठे आणि शुभा जोशी
संगीत लेबल: Zee Music Marathi