Lampat Jhampat /लंपट झंपट लिरिक्स
हलकी फुलकी जिंदगानी
मनात समदं…
आंतरीच्या बोचक्यात
सपान उमदं…
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं..
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं..
अशी लीला ही लंपट झंपट…
अशी लीला ही लंपट झंपट…
वयाचं याड न्यारं झोप नाही भूक रं..
खटयाळ पापनीत अप्सरेचं रूप रं.. (२)
नवं नवं हवं हवं आसं हे खुळ रं..
मनाची मुंगी चाटी भावनेचा गुळ रं..
आस पास गार भास
लबाड आज रं..
वसाड वावरात
गुलाबी गाजरं..
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं..
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं..
अशी लीला ही लंपट झंपट… ॥१॥
अशी ही आस अवली आभाळाला टेकली..
मिजास माज नाही लाज सारी फेकली.. (२)
दिलाचं दार आपलं आरपार मोकळं
कुनीबी यावं जावं सरबराई चोख रं
घाई घाई वाकडं तिकडं
कसबी चाला रं..
हाय हल्लो लब यु लब यु
मुखानं बोला रं..
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं..
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं..
अशी लीला ही लंपट झंपट… ॥२॥
चुकून भेट व्हावी जावं दूर लांब रं..
खुशाल हात हाती घ्यावा खुल्लेआम रं..
हसावी सांज सारी इरघळावा दिस रं..
अश्शात अंग व्हावं पाखराचं पीस रं..
तिरकी तिरकी गोड गिरकी
जीवाला पीळ रं..
उरलं सुरलं भान गेलं
नशीला फील रं..
बुकाच्या कागदाचा काळजाशी धागा रं..
उनाड चाळं देती सर्गामंदी जागा रं..
अशी लीला ही लंपट झंपट… ॥३॥
गीत : लंपट झंपट
गीतकार : मंगेश कांगणे
गायक :दिग्विजय जोशी
संगीत लेबल: Zee Music Marathi