Kashi Jhokat Chalali / कशी झोकात चालली
कशी झोकात चालली कोळ्याची पोर
जशी चवथीच्या चंद्राची कोर
फेसाळ दर्याचं पाणी खारं
पिसाट पिउनी तुफान वारं
ऊरात हिरव्या भरलं हो सारं
भरतीच्या ज्वानीला त्याहून जोर
टाकून टाकशील किती रं जाळी
मेघाची सावली कुणाला घावली
वार्यानं अजुनी पाठ नाही शिवली
वाटेला बांग दिली हिच्या समोर
केसांची खुणगाठ चाचपून पाहिली
फुलांची वेणी नखर्यानं माळली
कुणाला ठावं रं कुणावर भाळली
प्रीतीचा चोर तिचा राजाहून थोर
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: आशा भोसले
चित्रपट: मोलकरीण
गीत प्रकार: चित्रगीत