Everest Marathi Marathi Songs Music मराठी गाणी

Kadhi tu lyrics in marathi || कधी तू लिरिक्स

Kadhi tu || कधी तू 

कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात
कधी तू…
कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात,
सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा,
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात

कधी तू…
अंग अंग मोहरणारी,
आसमंत दरवळणारी,
रातराणी वेडया जंगलात
कधी तू…
हिरव्या चाफ्याच्या पाकळ्यांत
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात,
सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा,
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात

जरी तू…
कळले तरी ना कळणारे,
दिसले तरी ना दिसणारे,
विरणारे मृगजळ एक क्षणात
तरी तू…
मिटलेल्या माझ्या पापण्यांत
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
कोसळत्या धारा, थैमान वारा
बिजलीची नक्षी अंबरात,
सळसळत्या लाटा,
भिजलेल्या वाटा,
चिंब पावसाची ओली रात
कधी तू…
रिमझिम झरणारी बरसात
कधी तू…
चमचम करणारी चांदण्यात

गीत : कधी तू
गीतकार : सतीश राजवाडे, श्रीरंग गोडबोले
गायक : हृषीकेश रानडे
संगीत लेबल: Everest Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा