Band Baja / ब्यांड बाजा
मेहेंदी रंगली ग गौर पुजली ग
शुभ मुहूर्ताची सनई वाजली ग
हिरव्या चुड्यात भरजरी शालूत
गोड गोजिरी हि नवरी सजली ग
नवरी सजली ग नवरी सजली ग
मुहूर्त वेळा आली लगबग लगबग झाली
उरात का ग थरथर आणि
गाली चढली लाली
उरात का ग थरथर आणि
गाली चढली लाली
सजली नटली लाजली
लेक लाडकी चालली
ब्यांड बाजा, वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
ब्यांड बाजा, वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
चांदण राती झगमगता तारा
तुटताना दिसता अंबरात
मन म्हणते काही, चुकले तर नाही
अन काहूर उठते अंतरात
कधी तू हळवी हळवी च्या पावलात
हिंदोळा आभाळावर जाता
क्षणभर हि भोवळ कसली येते
हाती दे हात तुझा ग आता
जोडुया जन्मभराचे नाते
चाल चालू सप्तपदी
सोडुनिया शंका सारी
आणीन मी सर्वसुखे
भरभरुनिया संसारी
अधीर जराशी का उरी
ब्यांड बाजा, वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
ब्यांड बाजा, वरात घोडा
घेउनि या नवरोजी
लगीन घटिका समीप आली
करा हो लगीन घाई
गीत : ब्यांड बाजा
गीतकार : संगीता बर्वे, श्रीरंग गोडबोले आणि विश्वजीत जोशी
गायक : बेला शेंडे, आनंदी जोशी, सुरेश वाडकर, हृषीकेश रानडे, प्रियांका बर्वे, शिखा जैन
संगीत लेबल: Everest Marathi