Kutha Kutha Jayacha Honeymoonla / कुठं कुठं जायाचं हनिमूनला
अहो भरल्या बाजारी
धनी मला तुम्ही हेरलं
हेरलं ते हेरलं अन्
लगीन अपुलं ठरलं
लगीन झालं, गोंधळ झाला
आता एक काम हो ठरलं
लोणावळा, खंडाळा,
कोल्हापूरचा पन्हाळा
बेंगलोर, गोवा नि काश्मिरला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
रातभर एकली जागू कशी ?
सासूला अडचण सांगू कशी ?
घरात पाव्हणं न् दारात मेव्हणं
एकांत मिळेना भेटायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
नउवारी नेसून कारभारी
खेटून बसेन शेजारी
गरम अंथरूण गरम पांघरूण
गरमागरम ह्यो मामला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
गुलाबी थंडीत गमतीनं
मजेत राहू या संगतीनं
जातानं दोघं न् येताना तिघं
नातूच आणूया दावायला
कुठं कुठं जायाचं हनिमूनला ?
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: बाळ पळसुले
स्वर: आशा भोसले
चित्रपट: फटाकडी
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत