Kheltuya Khel / खेळतूया खेळ
खेळतूया खेळ असा मैतर
उगा जीव जाळतुया मैतर
कुण्या रागानं केलया घात रं
फुक्या स्वप्नात जागतीया रात रं
हूर-हूर लागलीया उगा मना जाळी
जीव झुरतुया डोळ आसवांना गाळी
मैतराच्या पीरमाची जाण तुला न्हाई
तरी जळतुया जीव कार तुझ्यापाई
कुठ गेलं कसा कुणा ठावं रं
इसरून मैतरीचा गाव रं
आलं उजळून सार विरहाच चांदण
काही उमगणा आज मैतराच वागण
कारं जळतोय जीव उगा तुझ्या पायी
तुझ्याविना जिवलग मला कोणी न्हाई
तुझ्यविना कस जगू सांग रं
फेडू कसं मैतरीचं पांग रं
गीत : खेळतूया खेळ
गीतकार : महेश नायकुडे
गायक : आदर्श शिंदे
संगीत लेबल: Zee Music Marathi