Kombadi Palali / कोंबडी पळाली
ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ ऑ
हा भार सोसेना जड झालाय पिकावानी
अंगात ज्वार भरलं तुझ्या प्रितीच पाज पाणी
घुमाजी राव माझा सांगा होणार का धनी
रात्रीला झोप नाही दावी लाव्तीया पापणी
चंद तु पुनावाचा तु ग रूपान गोजिर वाणी
जीव माझा जळतोया होत काळजाचं पाणी पाणी
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली -४
पोरं होते मी जवान झाले ऐन जवानीत बहरून आले
हि सुगंधी धुंद काया भेट देते तुला
मावळा मी मर्द गाडी ग हि मिठीची हीच घडी ग
दे ईशारा इश्क सारा येना माझ्या फुला
तुरू तुरू चालू नको गुलू गुलू बोलू नको
टकमक टकमक पाहू नको सोडून साथ कधी जाऊ नको
प्रेमाची स्टोरी चाल शेतात जाऊ राणी
अन् वाटात सूर भिडलं चल गाऊया गावरान गाणी
कोंबडी पळाली इथ भर उडाली फड फड फडाला लागली
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली – ३
जीव माझा तुझ्यात जडला श्वासो श्वासात रुतून पडला
साथ देते सात जन्मी प्रीती देईन तुला
या जीवाची झाली दैना रातीला मला झोपच येईना
मी तुझा ग झालो मजनू इश्क झाला मला
दिला सबूत आता मोडू नको
मन माझं भोळ सखे तोडू नको
बोकडी माग फिरू नको घराची कौलं फोडू नको
तुझी माझी जोडी जमली सुरु झाली या नवी कहाणी
तु माझा फुल राजा मी तुझीच रे फुल राणी
कोंबडी …
कोंबडी पळाली तंगडी धरून लंगडी घालाय लागली- २
गीत : कोंबडी पळाली
गीतकार : जितेंद्र जोशी, प्रियदर्शन जाधव
गायक : आनंद शिंदे, वैशाली सामंत, अजय गोगावले
संगीत लेबल: Rajshri Marathi