Meech Gele Javal Tyachaya / मीच गेले जवळ त्याच्या
मीच गेले जवळ त्याच्या, तो बिचारा लांब होता
वाटला मोती टपोरा तो दंवाचा थेंब होता
फसविले नाही कोणीही मीच फसले रे मना
मीच म्हंटले प्रेम त्याला ती असावी कल्पना
उपटुनिया टाकिला मी अंतरीचा कोंब होता
विसरण्याचा यत्न करिते परि न विसरे भेट ती
तुटक काही आठवे अन् अश्रू नयनी दाटती
मीच भवती नाचले रे तो विरागी सांब होता
विकल होसी तू कशाला का असा वैताग रे
सावल्यांचा बांध पडता थांबतो का ओघ रे
प्रीतीची माझ्या कथा ती संपली आरंभ होता
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: राम कदम
स्वर: आशा भोसले
चित्रपट: वर्हाडी आणि वाजंत्री
गीत प्रकार:चित्रगीत