आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी

Yaal Kadhi Ho Ghari Marathi Lyrics | याल कधी हो घरी

Yaal Kadhi Ho Ghari / याल कधी हो घरी

याल कधी हो घरी
घरधनी, याल कधी हो धनी ?
उगाच आले मन अंधारून
भीति दाटली उरीनको तेच मज दिसते डोळा
नयनी येतो उष्ण उमाळा
मुकेपणाने विरह दु:ख हे कुठवर साहू तरीअसाल कोठे कुठल्या ठायी
कुठे चालली घोर लढाई ?
रक्त गोठते म्हणती तेथे बर्फाच्या डोंगरीहे दुबळेपण मला न शोभते
सुदैवेच हे दु:ख लाभते
सात पिढ्यांनी अशीच केली देशाची चाकरीवीरपत्‍नी मी वीरकन्यका
गिळून टाकिन व्यथा हुंदका
नका तुम्हीही घरा आठवू, शर्थ करा संगरी

 

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: आशा भोसले
चित्रपट: छोटा जवान
गीत प्रकार: चित्रगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते