Best Marathi Ukhane For Bride
पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला,
_____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला.
स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली उडी,
_______ रावांच्या नावाने घालते गळ्यात, मंगळ सूत्राची जोडी.
चांदीची जोडवी, पतीची खून,
______ रावांचे नाव घेते_______ घराण्याची सून.
कोकिळाने लावला, झाडावर बसून सूर,
_________ रावांच्या आयुष्यात येऊदे, सुखाचा पूर.
लग्नानंतर सर्व स्त्रिया, होतात जबाबदार,
_____ राव दिसतात, फारच रुबाबदार.
मखमली हिरवळीवर, पाखरांचा थवा,
_____ रावांच्या वंशात, लावीन दीप नवा.
केस माझे कुरळे, सावली पडली गालावर,
_______ रावांचे नाव घेते, मैत्रिणींच्या बोलावर.
श्रीमंत माणसांना असते, पैशाची धुंदी,
_______ चे नाव घेण्याची, हि पहिलीच संधी.
मोर आहे भारताचा, राष्ट्रीय पक्षी,
_______ रावांचे नाव घेते, सर्वजण आहेत साक्षी.
स्त्रियांनी नवस केला, पती मिळावा सत्यवान,
_______ राव भेटले म्हणून, आहे मी भाग्यवान.
जीवनात सदैव आई वडिलांचा, आशीर्वाद असावा पाठी,
_______ रावांसारखे पती मिळावे, साथ जन्मा साठी.
तुम्ही सर्वांनीं मिळून, पसंद केली आमची जोडी,
________ रावांमुळे आली, माझ्या आयुष्याला गोडी.
कोकणातील जंगले आहेत, सुंदर आणि घनदाट,
________ रावांसोबत बांधली अखेर, लग्नाची जीवनगाठ.
एका लग्न समारंभात, झाली आमची भेट,
_______ रावांनी २ महिन्यात, मला बायको बनवून घरी न्हेली थेट.
देवापुढे मागते, सर्वाना चांगले भेटूदे आरोग्य,
_______ रावांच्या रूपात मिळाला, जीवनसाथी योग्य.
शुभमंगल झाले, आणि अक्षता पडल्या माथी,
_______ राव आजपासून, माझे जीवनसाथी.
चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणतात स्टार,
_______ रावांचे नाव घेऊन, करते सर्वाना नमस्कार.
प्रेमळ लोकांना आवडते, लव्ह शायरी,
______ रावांसोबत ओलांडते, मी घराची पायरी.
आई वडील आहेत, मुलांची छाया,
___________ ला आहे, खूप माया.
पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशा आहेत चार,
_______ रावांनी घातला गळ्यात, मंगळसूत्राचा हार.
लग्नासाठी सोडून, आले मी माहेर.
_______ आहेत माझ्या, सौभाग्याचा आहेर.
कोणीतरी आठवण काढत होते, म्हणून मी शिंकले,
_______ रावांचे मन, मी पहिल्या भेटीतच जिंकले.
आकाशात दिसतात, निळे निळे ढग,
_________ सोबत फिरेन मी, संपूर्ण जग.
कोकणाला जाताना, लागतो आंबा घाट,
_______ रावांच नाव घेते, सोडा माझी वाट.
मला आवडते, सर्वांची काढायला खोड,
_______ रावांचे बोलणे, मधापेक्षा गोड.
कोशिंबीर बनवण्यासाठी, कांदे ठेवले कापून,
________ रावंच नाव घेते, सर्वांचा मान राखून.
काचेच्या वाटीत, गाजराचा हलवा,
________ रावांच नाव घेते, सर्वांना बोलवा.
छान वाजवतात , कार्यक्रमात हलगी,
_______ राव आहेत बिझनेसमन, आणि मी शेतकऱ्याची मुलगी.
भाजीत भाजी, गवाराची,
______ आहेत कदमांचे, आणि मी आहे पवारांची.
सर्जेराव पाटलांची, आहे मी लेक,
________ आहेत माझे, एकुलते एक.
गाव माझे सातारा, आणि जिल्हा आहे कराड,
_________ आपल्या लग्नात, खूप आहे व्हराड.
आई-वडिलांना इंग्लिश मध्ये बोलतात, पप्पा आणि मम्मी,
___________ तुमची साथ हवी, सात जन्मी.
अलिबागला जाताना , मज्जा येते होडीने.
__________ घरात प्रवेश करू जोडीने.
इंद्रधनुष्यामध्ये रंग आहेत सात,
_______ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते आत.
आकाशातून पडतो, तुटता तारा,
________ मध्ये आहे, माझा जीव सारा.
अमरीतसर वरून आणला, हातात घालायला कडा,
________ रावांच्या नावाने भरते, लग्नचुडा.
लग्न आटपले, आणि काढली वरात,
________ सगळ्यांसमोर उचलून, न्या मला घरात.
कोकणचे समुद्र आहेत, निळे निळे गार,
__________ आहेत माझे, फेव्हरेट स्टार.
कृष्णा ने ठेवले गोकुळ खुश, वाजवून बासुरी,
_______ रावांच नाव घेऊन, आजपासून संसार सुरु सासरी.
चला सगळे घरी, संपली आमची वरात,
________ रावांच नाव घेऊन, पाऊल टाकते घरात.
तलावात उगवतात सुंदर कमळ,
_____ रावांच नाव घेते, आहेत खूप प्रेमळ.
ताटभर दागिन्यांपेक्षा, माणसं असावी घरभर,
_________ रावांचे नाव घेते, आशिर्वाद द्यावा जन्मभर.
पाण्याने भरला कलश, त्यावर आंब्याची पाने फुले,
________ च नाव घेतल्यावर, चेहरा माझा खुले.
देवाला भक्त करतो, मनोभारे वंदन,
_________ मुळे झाले, संसाराचे नंदन.
दिन दुबळ्यांचे गाऱ्हाणे, परमेश्वराने ऐकावे,
_______ रावांसारखे पती मिळाले, आणखी काय मागावे.
शेवटी आज आला, तो आनंदाचा दिवस,
______ रावांसारखे पती मिळावे म्ह्णून, केला होता नवस.
गेल्या त्या आठवणी , आणि गेले ते दिवस,
______ आज आहे आपल्या आयुष्याचा, सुखाचा दिवस.
परिवार खुश राहील, जोडून नाती घट्ट,
______ पुरवतील आता, माझा सर्व हट्ट.
हळद लावण्यासाठी, बसली मी पाटावर,
_____ रावांच नाव काढलंय, मेहंदीने हातावर.
श्रीविष्णूच्या मस्तकावर, सदैव असतो शेष,
________ रावांचे नाव घेऊन, करते गृहप्रवेश.
सासू सासऱ्यांनी काम केले, एक पून्याचे,
______ रावांना दान दिले, मला जन्माचे.
संगमरवरी देवळात बसविली, साईंची मूर्ती,
________ रावांशी लग्न झाले, झाली इच्छा पूर्ती.
दादरला गेलो बांधायला, लग्नाचा बस्ता,
______ रावांचे नाव घेते, आता सोडा माझा रस्ता.
उन्हाच्या उकाड्यामुळे, सगळे झाले त्रस्त,
सगळे म्हणतात ______ आणि _______ ची जोडी आहे जबरदस्त.
कपाळावरील कुंकू, मांगल्याची खूण,
______ रावांची आणि माझे जुळले, ३६ गुण.
आमचे लग्न होईल कि नाही, अखेर स्वप्न झाले साकार,
______ रावांनी खूप कष्ट केले, मिळण्यासाठी घरच्यानकडून होकार.
गळ्यात मंगळसूत्र, हि सौभाग्याची खून,
_________ रावांचे नाव घेते ______ ची सून.
देवाला जे मागितले, ते सर्व मिळाले,
खूप खुश आहे आज मी, कारण ______ सोबत माझे लग्न जुळाले.