Marathi Jokes for Friends
पिकनिक
एक मित्र आपल्या पिकनिकसाठी
मित्रांना स्मशानभूमीत घेऊन जातो…
सगळे मित्र – ऐ आम्हाला कुठ घेऊन आलास्?
मित्र – अरे वेडयांनो, “लोक मरतात ” इथं यायला !!!
😂😂😂😂😂
मूड
मन्या – काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये?
गणु – काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत…!
मनू – मग आज मूड ऑन कसा…?
गणू – आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय…!!!
😂😂😂😂😂
परीक्षा
परिक्षा हॉल…
मंग्या – दुसऱ्या प्रश्नाचे उत्तर दाखव…
बारक्या – नाही लिहले…
मंग्या – तिसऱ्या
बारक्या – नाही
मंग्या – चार, पाच, सहा
बारक्या – नाही, नाही, नाही…!
मंग्या – तु फक्त पास तर हो रे…!
तुला मारला कसा ते सावधान इंडिया मध्ये दाखवतील…!!!
😂😂😂😂😂
अब तक छप्पन
तीन मित्र बोलत असतात…
पहिला मित्र – माझ्या बायकोन जुडवा पिच्चर बगीतला आणि तिला जुडवा पोर झाली…
दूसरा मित्र – व्हय र, माझ्यापण बायकोन 3 इडीयट बगीतला तिला 3 पोर झाल्यात…
हे ऐकूण तीसरा मित्र पळत सुटतो….
बाकीचे दोघे -अरे कुट पळतोयस…?
तिसरा मित्र – आमची खुळी अब तक छप्पन बघायला गेलीये…!!!
😂😂😂😂😂
आत्महत्या
दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात…
पहिला मित्र – जाऊ दे यार चल, आत्महत्या करू…
दुसरा – येडा बिडा झालास का काय…?
पुढच्या जन्मी परत बालवाडी पासून स्टार्ट करावं लागेल…!!!
😂😂😂😂😂
काम
दोन मित्र फोनवर बोलत असतात…
पहिला – हेलो भाई, काय म्हणतोस…!
दुसरा – मस्त रे एकदम, तू काय म्हणतोस…
पहिला – अरे एक काम होते…
दुसरा – हा कर मग, थोड्या वेळाने बोलू निवांत, चल बाय…
😂😂😂😂😂
पत्र
गंपू – तुझ्याकडे माझा मोबाइल नंबर आहे ना?
मग पत्र का पाठवलंस?
झंपू – आधी फोनच केला होता.
पण एक बाई सारखी सांगत होती…
‘प्लीज ट्राय लेटर’!
😂😂😂😂😂
अवघड प्रश्न
झंप्या – माझ्या एका प्रश्नाचं उत्तर आतापर्यंत एकाही पोरिला देता आलं नाही..
पोरगी – इतका अवघड आहे का ? विचार, मी सांगते..
झंप्या:
.
.
.
“तुझा फोन नंबर काय? ”
😂😂😂😂😂
बदल
परिक्षा पास झाल्यावर्…
आई – देवाची कृपा.
सर – माझ्या मेहनतीमूळे.
बाबा – मुलगा कोणाचा आहे.
मित्र – चल एक बीयर मारु…
पण,नापास झाल्यावर्…
सर – वर्गात लक्ष नाही.
आई – मोबाईलचा परिणाम.
बाबा – आईचे लाड.
मित्र – चल एक बीयर मारु…
सगळे बदलतात पण मित्र बदलत नाहीत…
😂😂😂😂😂
फ्रेंड आणि बेस्ट फ्रेंड यातील फरक
मित्र तो, जो जेल मधुन आपली जमानत करेल ..
आणी खरा मित्र तो जो जेलमधे आपल्या बाजुला बसलेला असेल
आणी म्हणेल – काय सॉलिड धुतला रे त्याला आपण…
😂😂😂😂😂
गण्या: अरेंज मॅरेज म्हणजे काय ?
बंड्या: सोप्प आहे रे , समज… तू रस्त्यावरून चालला आहेस आणी अचानक तुला नागीण चावते ..
गण्या: आणी लव मॅरेज म्हणजे काय ?
बंड्या: लव मॅरेज म्हणजे तू त्या नागीण कडे जातो आणी तीला बोलतो
फूस फूस … चाव ना मला ..चाव ..
😂😂😂😂😂
गण्या: हे बघ मी आपल्या कुत्र्याला मराठी बोलायला शिकवलं…
पक्या: गप रे, काहीपण बोलतोस…
गण्या: अरे हो, तुला पहायचं का?
पक्या: दाखव…
गण्या कुत्र्याला म्हणतो, “सांग हा माझा कोण?”
कुत्रा बोलतो, “भाऊ… भाऊ… भाऊ….”
😂😂😂😂😂
गण्या रात्रीच्या जेवणाला पहिल्यांदाच मासे खातो,
जेवण झाले तरी तासभर पाणी पीत नाही
.
.
.
.
कारण त्याला भीती असते, चुकून मासा त्यात पोहायला लागला तर
😂😂😂😂😂
गण्या – यार दिनू तु प्रत्येक पँक नंतर खिशातुन
दरवेळेला काय काढुन पाहत आहे?
.
.
.
.
पक्या – बायकोचा फोटो रे, जेव्हा ती सुंदर
दिसेल तेव्हा समजायच मला दारु चढली आहे…
😂😂😂😂😂
चिंटू : यार मला सांग I am going याचा अर्थ काय?
पिंटू : मी जात आहे.
चिंटू : असा कसा निघून जातोस यार! सकाळपासून मी 20 जणांना हाच प्रश्न विचारला
आणि सगळेच मी जातोय असं म्हणाले. जाताना उत्तर देऊन जा.
😂😂😂😂😂
दोन मित्र दारूच्या नशेत रेल्वे रुळांच्या मध्यभागी चालत होते.
पहिला : अरे देवा, मी याआधी इतक्या पायऱ्या कधीच चढल्या नाहीत.
दुसरा: अरे पायऱ्या तर ठीक आहेत, पण त्यांना धरण्यासाठी रेलिंग किती खाली आहे ते बघितलेस का?
😂😂😂😂😂
मित्र – काय झालं, तू एवढा आनंदी कसा आहेस?
मुलगा – आज पहिल्यांदा माझ्याशी एक मुलगी स्वतःहून बोलली.
मित्र – अरे वा! कसं काय?
मुलगा – मी बसमध्ये बसलो होतो आणि ती मुलगी येऊन म्हणाली,
ऊठ ही लेडीज सीट आहे.
😂😂😂😂😂