Bhau Marathi Rap | भाऊ
भाऊ भाऊ अस कस भाऊ
राव राव अस कस राव
वाढते महागाई वाढू दे
तरुण नशेत पडलेत पडू दे
शेतकरी आत्महत्या करतायत करु दे
शिकलेले बेरोजगार फिरतेत फिरुदे
च्यायला,
थोडं ध्यान देउन ऐका
दिसत नाय का ?
डोळ्यात घेतलाय का ?
कानात टेकवलाय का ?
जातीचा झेंडा लय वर लावलाय
माणसात माणूस राहिलाय का?
अर पैसा पैसा ऊ…..
अर पैसा पैसा हा…..
अर पैसा पैसा ऊ…..
अर पैसा पैसा हा…..
सत्यानाश केला बुद्धीचा पैशाने कर्जात
फास लावली शेतकरी बापाने मत देत
आलातो उपाशी पोटाने हातभार
देईल कोणी या तो या आशेने
काय केले राव तुम्ही लांडगे झाले राव
गळ फास पेरले भाऊ
अहो माणसं खाल्ली राव
मूडदे गाडले जमिनी लुबाडल्या झाडे तोडली
दिवसा ढवळ्या एक नवीन स्कीमय एक नवीन स्कीमे
एक नवीन स्कीमे, एक काय कामाची नाय ती
आहो काका आला नाका
इथं तिथं थुकू नाका
जरा बघा थोडं थांबा
माग नाही पुढं वळा
तारखेव तारीख मोठ्या गुन्ह्यासाठी का ?
बलात्कार्याला सरळ देत नाहीत फाशी का ?
पोचलोय चांद्रव येतोय रस्त्याव
लढतोय झगडतोय रोज हक्कासाठी का?
झाला घोटाळा का ?
केला घोटाळा का ?
खऱ्याच्या तोंडाला लावला का टाळा का
इस्त्रीये तुमच्या खादी कपड्यालाना
भोकं पडली गरीबाच्या सद्र्याला का?
गरीबाच्या सद्र्याला का?
गरीबाच्या सद्र्याला का?
गरीबाच्या सद्र्याला का?
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान
जय जवान जय किसान
हा
एक साथ एक जुट एक मूठ
होतो कलवर लढा देत आलो
एकीच्या बळापासून इंग्रजांच्या मुळावर
हम सब एकहेना शिकत आलो शाळेच्या बाकावर
आले आयघाले जाती धर्माचे धडे शिकवले
पक्षाचे दुकानं खोल्ले करोडो छापले
आपलेच आपल्याला कापायला लावले
आपल्याने आपलेच कापले
गीत : भाऊ मराठी रॅप
गीतकार : शंभो
गायक : शंभो
संगीत लेबल: SHAMBHO RAP