Baharla Ha Madhumas /बहरला हा मधुमास
आली उमलून माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
घाली साद तुला मन घाली
तू ना जरी भवताली रे
सुचव ना तूच उपाय आता
आहा हा..
तू नार सखे सुकुमार
नजरेत तुझ्या तलवार
तु सांग कसा इझणार
हे हे हे.. जी
तु सांग कसा इझणार
उरीचा धगधगता वनवा
आली उमलून माझ्या गाली
प्रीत नवी मखमाली रे
बहरला हा मधुमास नवा
किती वसंत मनात उमलून आले
आणिक दरवळले
कधी तुझ्याच सुरात हरवून गेले
काहीच ना कळले
वाजती पैंजणे ही मुक्या स्पंदनी
दाटते प्रीत या गुंतल्या लोचनी
ही साद तुझ्या हृदयाची
हलगीच उरी प्रणयाची
हुरहुर मनी मिलनाची
हे हे हे.. जी
हुरहुर मनी मिलनाची
दे सखे कौल आता उजवा
झाली रुणझुण ही भवताली
लाज अनावर झाली रे
सुखाला साज नवा चढला
गीत : बहरला हा मधुमास
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : अजय गोगावले आणि श्रेया घोषाल,
संगीत लेबल: एव्हरेस्ट मराठी
गीत संग्रह / चित्रपट : महाराष्ट्र शाहीर