Satyam Shivam Sundara / सत्यम् शिवम् सुंदरा
नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा
सत्यम् शिवम् सुंदरा
शब्दरूप शक्ती दे
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपांखरा
विद्याधन दे अम्हांस
एक छंद, एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरा
होऊ आम्ही नीतिमंत
कलागुणी बुद्धिमंत
कीर्तिचा कळस जाय उंच अंबरा
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: उत्तरा केळकर, सुरेश वाडकर
चित्रपट: सुशीला
गीत प्रकार: प्रार्थना, चित्रगीत