Aaj Guj Sangate Tula / आज गुज सांगते तुला
आज गुज सांगते तुला, छंद एक लागला मला
पहाटची उठून मी उगीच चुंबिते फुला फुला
धुक्यात धुंद हिंडते, स्वप्नलोक धुंडते
हळूच फुंक घालुनी फुलविते दला-दला
फुलापरीस कोमले चुंबितेस तू फुले
सुगंध त्या फुलातला या मनात कोंदला
त्या फुलात कल्पना दावि दोन लोचना
त्याही लोचनांस सखी तोच ध्यास लागला
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: महेंद्र कपूर, लता मंगेशकर
चित्रपट: बाप माझा ब्रह्मचारी
गीत प्रकार: युगुलगीत, चित्रगीत