आनंदघन चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर शान्‍ता शेळके

Aale Vayat Mi Balpanachi Marathi Lyrics | आले वयात मी

Aale Vayat Mi Balpanachi / ​आले वयात मी बाळपणाची

आले वयात मी, बाळपणाची संगत सुटली
गोर्‍या गाली प्रीतिची लाली अवचित उठली !

निशिदिनी, बाइ, मी मनामध्ये तळमळते
ही नवखिच कसली हुरहुर मज जाळते
जीव होतो गोळा
झोप नाही डोळा
येतो दाटुन गळा
सख्यासोबतिणींची मला संगत नकोशी वाटली !

तू जिवलग माझा, बाळपणातिल मैत्र
बोल हसुन जरा, बघ, फुलांत नटला चैत्र
एका ठायी बसू
गालागालांत हसू
डोळा मोडून पुसू
चार डोळे भेटता दोन मने एकवटली !

गीत: शान्‍ता शेळके
संगीत: आनंदघन
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: राम राम पाव्हणं
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते