Aandhalepana Phite Jivant / आंधळेपणा फिटे जिवंत
आंधळेपणा फिटे जिवंत होतसे दिठी रे
उजेड तूच दाविलास या जिवास शेवटी रे
सूर्य-चंद्र-चांदण्या दूर दूर राहू दे
दिससी तू तसाच का? तेज मला पाहू दे
नकोच आज लोकलाज घालू दे तुला मिठी रे
देव-दैव याहुनी मजसी तूच थोर रे
उघडताच पापणीतूच ये समोर रे
कवेत घेई बावरेस हसव धरून हनुवटी रे
पाहणे, न पाहणेसारखेच यापुढे
वेड तेच या जगी तुझेच रूप आवडे
खरेच रलं-माणके तुझ्यापुढे न भावती रे
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: देवमाणूस
गीत प्रकार: चित्रगीत