Aikashil Majhe Ka Re / ऐकशील का रे माझे
ऐकशील का रे माझे अर्थहीन गीत?
दूर दूर जाते धरुनी उरी तुझी प्रीत !
वाट तुझी बघता दारी पाय थकुन गेले
निमंत्रणावाचुनी जवळी मरण मात्र आले
फेकलेस चरणावरचे फूल तू धुळीत !
भाग्य हेच अजुनि येतो गंध पाकळीस
स्पर्श तुझा झाला होता चुकुन या कळीस
उमलताच सुकले तरीही आयु हे पुनीत !
सूर आर्त गीताचा या तुझ्या घरी यावा
अश्रुबिंदु एकच नयनी तुझ्या ओघळावा
हेतु एक शेवटचा या थरथरे मनात !
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: सुधीर फडके
स्वर: आशा भोसले
चित्रपट: लाखाची गोष्ट
गीत प्रकार: चित्रगीत