Amhi Chalavu Ha Pudhe Varsa / आम्ही चालवू हा पुढे वारसा
गुरूने दिला ज्ञानरूपी वसा
आम्ही चालवू हा पुढे वारसा
पिता-बंधु-स्नेही तुम्ही माउली
तुम्ही कल्पवृक्षातळी सावली
तुम्ही सूर्य आम्हा दिला कवडसा !
जिथे काल अंकुर बीजातले
तिथे आज वेलीवरी ही फुले
फलद्रुप हा वृक्ष व्हावा तसा !
शिकू धीरता, शूरता, वीरता
धरू थोर विद्येसवे नम्रता
मनी ध्यास हा एक लागो असा !
जरी दुष्ट कोणी करू शासन
गुणी सज्जनांचे करू पालन
मनी-मानसी हाच आहे ठसा !
तुझी त्याग-सेवा फळा ये अशी
तुझी कीर्ती राहील दाही दिशी
अगा पुण्यवंता भल्या माणसा !
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: प्रभाकर जोग
स्वर: अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
गीत प्रकार: चित्रगीत, स्फूर्ती गीत