Anand Aagala Ha Mi / आनंद आगळा हा मी
कोण्या कुमारीकेला सर्वस्व दान केले
आनंद आगळा हा मी आज मुक्त झाले
आला अतिथ दारी, त्या पाहुणेर झाला
माझ्याच कुंकवाचा त्या मी अहेर केला
माझे चुडे दिले मी, ते हात गौरविले
माझी कळी जळाली, फळ लाभले दुजीला
दिधलास ईश्वरा तू, तो जन्म धन्य झाला
मरणाविना मनाचे सुखदु:ख रे निमाले
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: राम कदम
स्वर: आशा भोसले
चित्रपट: रंगपंचमी
गीत प्रकार: चित्रगीत