Anand Harpla / आनंद हरपला
मुखात सुखाची साखर ठेवून
जोडली जन्माची नाती
रामाच्या रूपात जपला माणूस
मारुती रायाची छाती
वाघाची लीला नी कपाळी टिळा
तू उजेड अंधारासाठी
भनक भीतीची नव्हती भवती
आभाळ रे माझ्यापाठी
देऊन किनारा मनाच्या होडीचा
सारंग हरवला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
नाराज नशीब घेऊन एखादा
जन्माला आलेला कुणी
पडली नजर तुझी त्याच्यावर
अखंड राहीला ऋणी
विसर पडावा घडू नये कधी
जिव्हारी जिवंत जाण
दारात तुळस कौलारू कळस
देव्हाऱ्यात तुझा मान
दिनांचा देव्हारा सोडून मोकळा
श्रीरंग परतला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
देऊन कान तू ऐकली गाऱ्हाणी
सदैव देवाच्या आधी
सवाल छळतो आता मी कुणाला
दाखवू नवस यादी
वार सणवार रेखीव रांगोळी
दारात सजेल जेव्हा
वादळ होऊन तुझी आठवण
दाटून येईल तेव्हा
घराघरातला उंच थरातला
गोविंद हरवला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
वाऱ्याला खुपली आनंद झुळूक
विझला तेजाचा दिवा
असाच उजेड देणारा दिवा
तो आणील कुठून नवा
येतील जातील देणारे हात
तू तिथे ही उजवा देवा
गाय-गरिबाची बात नको
तुझ्या वैऱ्यास वाटेल हेवा
देऊन भरारी आभाळा पल्याळ
पतंग सरकला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
माझा आनंद, आनंद, आनंद हरपला
आ आ.. हरपला..
गीत : आनंद हरपला
गीतकार : मंगेश कांगणे,
गायक : सौरभ साळुंके,
संगीत लेबल: झी म्युझिक कंपनी
गीत संग्रह / चित्रपट : धर्मवीर