चित्रगीत दादा कोंडके भक्तीगीत मराठी गाणी

Anjanichya Suta Tula Marathi Lyrics | अंजनीच्या सुता तुला

Anjanichya Suta Tula / अंजनीच्या सुता तुला

अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान
एक मुखाने बोला, बोला जय जय हनुमान

दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया
बालपणी गेलासी तू सूर्याला धराया
हादरली ही धरणी, थरथरले आसमान

लक्ष्मणा आली मूर्च्छा लागुनिया बाण
द्रोणागिरीसाठी राया केले तू उड्डाण
तळहातावर आला घेउनी पंचप्राण

सीतामाई शोधासाठी गाठलीस लंका
तिथे रामनामाचा तू वाजविला डंका
दैत्य खवळले सारे परि हसले बिभिषण

हार तुला नवरत्‍नांचा जानकीने घातला
पाहिलेस फोडुन मोती राम कुठे आतला
उघडुनी आपली छाती दाविले प्रभु भगवान

आले किती, गेले किती, संपले भरारा
तुझ्या परि नावाचा रे अजुनी दरारा
धावत ये लवकरी, आम्ही झालो रे हैराण

धन्य तुझे रामराज्य, धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा?
घे बोलावून आता कंठाशी आले प्राण

 

गीत: दादा कोंडके
संगीत: रामलक्ष्मण
स्वर: महेंद्र कपूर
चित्रपट: तुमचं आमचं जमलं
गीत प्रकार: भक्तीगीत, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते