Asa Ekhada Pakharu Velhal / असं एखादं पाखरू वेल्हाळ
गोर्या देहावरती कांति, नागीणीची कात
येडे झालो आम्ही ज्यावी एकादिच रात
तुझ्या रूपाचं बाशिंग डोल्यांत
तुझ्यावाचून सुन्नाट दिनरात
असा बोल बोलती जग पंखात घेती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याच्या भांगात बिंदिचा गुल्लाल
काल्या एकल्या राती, मन मोडून जाती
असं एखादं पाखरू वेल्हाळ
ज्याला सामोरं येतंया आभाळ
याला काय लेवू लेणं, मोतीपवळ्याचं रान?
राती चांदण्या रानांत शिणगार
सारी दौलत जरीच्या पदरात
गीत: ना. धों. महानोर
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: रवींद्र साठे, उषा मंगेशकर
चित्रपट: जैत रे जैत
गीत प्रकार: चित्रगीत