Ashi Kashi Odh Bai / अशी कशी ओढ बाई
बिगी बिगी बिगी चाल ग, बाई चाल ग मर्दिनी
वाट बघत असंल घरधनी न्याहरीच्या ग पाई
पायाम्होरं पळतंय मन, झाली त्याला घाई
अशी कशी ओढ बाई असं कसं वेड, विचारू कुणाला?
मनाला मनाला ग, मनाला मनाला !
प्रीतीनं हाक ही दिली, साद घातली
कुणाला कुणाला?
मनाला मनाला ग, मनाला मनाला !
कळीला वारा फुंकर घाली झुळुझुळु का झुळुझुळु
अन् पदर पाकळी उमलू लागे हळूहळू का हळूहळू
सजणा, सांग ना
ही किमया असते अशी जादु ही कशी, भुलविते मदनाला
खट्याळ पाणी गातंय् गाणी गुणुगुणु का गुणुगुणू
अन् लाटांच्या पायी पैंजण बोले रुणुझुणु का रुणुझुणू
सजणा, सांग ना
या नदीला सागर दिसं लागलं पिसं, खळखळत्या पाण्याला
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: सुरेश वाडकर
चित्रपट: लक्ष्मी
गीत प्रकार: चित्रगीत, युगुलगीत