आशा भोसले चित्रगीत मराठी गाणी लावणी

Avati Bhavati Dongar Jhadi Marathi Lyrics | अवतीभवती डोंगर झाडी

Avati Bhavati Dongar Jhadi / अवतीभवती डोंगर झाडी

अवतीभवती डोंगर झाडी, मधी माझी ग सासुरवाडी
दोन मजली रंगीत माडी, दारी बांधली बैलांची जोडी

(हिचा भरतार तालेवार तालुक्याचा सावकार
गोड बोल्या गंगाराम, गडी गावात रुबाबदार)

दोन डोंगरामधली वाट, वर चढाया अवघड घाट
घोडं घेऊन मुराळी आला, मी निघाले नांदायाला
नवी कोरी नेसून साडी

घोडं चालतंय दिडकी चाल, झोकं घेतात कानात डुल
माझ्या गळ्यात वजरटिका ग, नाकी नथीनं धरलाय ठेका
घातली हौसेनं सोन्याची बुगडी

संख्या संगती एकान्तात, प्रीत फुलंल अंधारात
हुईल काळजात गोड गुदगुली, लाल होतील गाल मखमली
मिळंल मिठीत मधाची गोडी

गीत: प्रभाकर नाईक
संगीत: बाळ पळसुले
स्वर: आशा भोसले
चित्रपट: थापाड्या
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते