ग. दि. माडगूळकर चित्रगीत मराठी गाणी लता मंगेशकर

Badalati Nabhache Rang Marathi Lyrics | बदलती नभाचे रंग

Badalati Nabhache Rang / बदलती नभाचे रंग कसे

बदलती नभाचे रंग कसे !
क्षणांत निळसर, क्षणांत लालस, क्षण सोनेरी दिसे !

अशा बदलत्या नभाखालती
वसते अवनी सदा बदलती
कळी कालची आज टपोरे फूल होउनी हसे !

मेघ मघा जे लवले माथी
क्षणांत झाले धार वाहती
फूल कालचे फळ होउनिया भरले मधुर रसे !

काल वाटले स्पर्श नच करू
त्या कीटाचे होय पांखरू
वेगवेगळे रंग तयाचे, इंद्रधनू उडतसे !

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: वसंत देसाई
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: ये रे माझ्या मागल्या
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते