Besuri mi / बेसूरी मी
मन हरले होते तेव्हा
वय अवखळ होते
न चुकले होते तेव्हा
पण झुकले होते
दिसले जे सहजा सहजी
ते फसवे होते
जे असुनी दिसले नव्हते
शोधत होते
नको शोधू मला मी तुझी सावली
तू आहे म्हणुनी हे अस्तित्व आहे मला
एक आवाज मी देवूनी साद मी
न ऐकू हि आली कधी ना समजली तुला
बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
मी अधुरी तू दूर माझ्या
बेसुरी मी तू सूर माझा
अंतर हे वाढत गेले पण तुटले नाही
तू मिटले डोळे तरीही मी मिटले नाही
स्वर्गातून जुळल्या गाठी मन जुळले नाही
प्रश्नांना उत्तर कधीही कळले नाही
रोज मातीस या ओढ आभाळाची
जरी दूर वाटे क्षितीजास भेटे पुन्हा
दैव जाणून मी देव मानून मी
किती आर्ततेने हि केली तुझी प्रार्थना
पण बेसुरी मी तू सूर माझा
बेसुरी मी तू सूर माझा
मी अधुरी तू दूर माझ्या
बेसुरी मी तू सूर माझा
सर्व सोडून मी हात जोडून मी
तुला मागते मी तुझा हात देशील का
मन हेलावते अन मी धावते
तुझी साथ देण्या तू आधार घेशील का
बेसूरी मी ….जीव लावूनी ….विनवूनी…नाकारलेली
बेसूरी मी ….परिणाम सगळे हसूनी … स्विकारलेली
बेसूरी मी ….वर्षांनूवर्षे झूरलेली… ना हारलेली
बेसूरी मी ….जगणे तुझ्यास्वप्नांनी … साकारलेली
गीत : बेसूरी मी
गीतकार : अजय-अतुल
गायक : वसुधरा
संगीत लेबल: Desh Music