Chala Jejurila Jau / चला जेजुरीला जाऊ
लई दिसाची हौस राया
चला आता पुरी करू – २
चला जेजुरीला जाऊ – ६
एक आना अबलक घोडा – २
त्याची रेशीम खाली सोडा – २
माग बसा मी पुढ्यात बसते – २
जगाला कौतुक दावू
चला जेजुरीला जाऊ – ६
जेजुरी गडावर जाऊ – २
देव माल्हारीला पाहू – २
आपण दोघ जोडीजोडीने –
बेल भंडारा वाहू
चला जेजुरीला जाऊ – ६
गीत : चला जेजुरीला जाऊ
गीतकार : जगदीश खेबुडकर
गायक : उत्तरा केळकर
संगीत लेबल: Marathi Cinema Scope