Chand Kevadyachi Raat / चांद केवड्याच्या रात
चांद केवड्याची रात, चांद केवड्याची रात आलिया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा
तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा
माझं जीवन आलंया मोहोरा
तुझ्या गान्यानं वेढलं शाहिरा
माझं जीवन आलंया मोहोरा
तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
तुझ्या शब्दांचा होरा, जीव आला बावरा
अशा झोकात झिंगले शाहिरा, मन वादळ वाऱ्यात भोवरा
अशा झोकात झिंगले शाहिरा, मन वादळ वाऱ्यात भोवरा
चांद केवड्याची रात आलिया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा
शुभ्र काचेत पारा तसा संग चातुरा
शुभ्र काचेत पारा तसा संग चातुरा
हिरव्या आषाढ बनात डांगोरा, कसा पान्यात लाविला अंगारा?
हिरव्या आषाढ बनात डांगोरा, कसा पान्यात लाविला अंगारा?
चांद केवड्याची रात आलिया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा
जरा बांध गजरा, माझी आन शाहिरा
जरा बांध गजरा, माझी आन शाहिरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा
नव्या फुलून आलेल्या संसारा, माझ्या घराला सोन्याचा उंबरा
चांद केवड्याची रात, चांद केवड्याची रात आलिया सामोरा
राजा माझ्या अंबाड्याला बांधावा गजरा, बांधावा गजरा, बांधावा गजरा
गीत: ना. धों. महानोर
संगीत: पं. हृदयनाथ मंगेशकर
स्वर: लता मंगेशकर
गीत प्रकार: भावगीत