Chand Tu Nabhatala / चांद तू नभातला
चांद तू नभातला नि बावळा चकोर मी
गुलाम होऊनी तुझा उभा तुझ्या समोर मी
तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू राघिनी
तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी
उरात श्वास कोंडतो उगा अशी नको रुसू
शोधू सांग नेमके प्रिये कुठे तुझे हसू
तू प्रेमाला तू श्यामला तू कोमला तू दामिनी
वेंधळा जरी तरी तुझाच चित्त चोर मी
पहाट तू ग मलमली कोवळ्या उन्हातली
मधाळ गोड शिरशीरी शहारल्या मनातली
तु रोहिणी तु मानिनी सखे तू चैत्र यामिनी
मेघ पावसाळी तू नि चिंब चिंब मोर मी
गीत : चांद तू नभातला
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : स्वप्नील बांदोडकर
संगीत लेबल: Zee Music Marathi