Chandarani Ka Ga Disates / चंदाराणी चंदाराणी का ग
चंदाराणी, चंदाराणी, का ग दिसतेस थकल्यावाणी
शाळा ते घर, घर ते शाळा, अम्हां येतो कंटाळा
रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ?
वारा-वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
कसा गडे तू तोल राखसी, पुढती पुढती पाय टाकिसी
काठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांती
चढसी कैसी, कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखंड फिरसी
वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई
म्हणुनिच का तू अवचित दडसी, लिंबामागे जाऊन रडसी
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: श्रीनिवास खळे
स्वर: आशा भोसले
चित्रपट: जिव्हाळा
गीत प्रकार: बालगीत, चित्रगीत