Chandava / चांदवा
साथ सावलीला सावलीची तापल्या उनात…
स्वर्ग सात पावलांचा उमगला वनव्यात
वाट फुफाट्याची जरी
तुझ्या सोबतीचं सूख
हात हातामंदी येता
हारपली तान भूक
अवसेच्या राती भेटला
डोळ्यामंदी तुझ्या चांदवा
विझू विझू वेडा जीव काहूरतो येता जाता
गाठ शेल्या पदराची नाही सुटायाची आता
लागलीया अशी अोढ सोसनंबी झालं ग्वाड
गावलं जे सायासानं जपायचं जीवापाड
वाट फुफाट्याची जरी
तुझ्या सोबतीचं सूख
हात हातामंदी येता
हारपली तान भूक
अवसेच्या राती भेटला
गीत :चांदवा
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : संतोष बोटे
संगीत लेबल: Video Palace