Everest Marathi Marathi Songs Music केवल वाळंज मराठी गाणी

Chandra Zhulyavar Marathi Lyrics || चंद्र झुल्यावर

Chandra Zhulyavar / चंद्र झुल्यावर

चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी नाही म्हणता म्हणता
निळ्याशार पाण्यावर तरंगली हळवी सर
झिमझिमत्या चांदण्यात चंपक भिजता भिजता
मोहरला आज जणू स्वप्नांचा इंद्रधनू
नवरंगाचे नयनी तो रन तो बघता बघता…

चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी नाही म्हणता म्हणता

चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी नाही म्हणता म्हणता
निळ्याशार पाण्यावर तरंगली हळवी सर
झिमझिमत्या चांदण्यात चंपक भिजता भिजता

तू अशीच मला बघत रहा फुले हळूच टिपत
रान रान मोहरेन मोहक हसता हसता
ह्रिदयाचे गीत असे ह्रिदयाला उमजत असे
ओठातून सूर उमले गाणे जुळता जुळता
मोहरला आज जणू स्वप्नांचा इंद्रधनू
नवरंगाचे नयनी तो रन तो बघता बघता

चंद्र झुल्यावर आपण दोघे बसता बसता
होकार हि दिला मी नाही म्हणता म्हणता

गीत : चंद्र झुल्यावर
गीतकार : अरुण सांगोळे
गायक : केवल वाळंज
संगीत लेबल: एव्हरेस्ट मराठी

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा