मराठी उखाणे

Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane | छत्रपती शिवाजी महाराज उखाणे

Chhatrapati Shivaji Maharaj Ukhane

शिवाजी महाराज आहेत, अखंड भारताची शान,
________ रावांचे नाव घेते, ताठ ठेवून मान.
सह्याद्रीच्या छातडातून, नाद भवानी गाजे,
_______रावांचे नाव घेते, छत्रपती शिवाजी महाराज आमचे राजे.
छत्रपती शिवाजी महाराज होते, महाराष्ट्राच्या पाठीचा कणा,
_____ च नाव घेतो सर्वानी, जय महाराष्ट्र म्हणा.
धन्य ती जिजाऊ आणि शहाजी राजे, ज्यांनी जन्म दिला शिवबाला,
_____आले आयुष्यात म्हणून, महत्व भेटले जीवनाला.
तलवार आणि ढाल आहे, शिवबांचे शस्त्र,
________राव आहेत माझे पती, आणि जिवलग मित्र.
शिवबांचे मावळे आम्ही, जन्म आमचा मराठ्यांच्या जातीचा,
_________ च नाव घेतो, अभिमान आम्हाला या मातीचा.
छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव, अमर आहे जगात,
_________ रावांचे नाव घेते______ च्या घरात.
जिथे शिवभक्त उभे राहतात, तिथे शांत बसतात सर्व,
______ रावांसारखे पती मिळाले, म्हणून आहे मला गर्व.
मराठा साम्राज्य निर्माण करण्यासाठी, 
छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतली उडी,
___________ रावांच्या नावाने, 
गळ्यात बांधते मंगळसूत्राची जोडी.
छत्रपती शिवाजी महाराज, नेहमी गादीवर बसावे,
______ रावांचे नाव घेते, तुमचे आशीर्वाद सदैव असावे.
शिवरायांनी राज्य केले, शक्ती पेक्षा युक्तीने,
_______ रावांचे नाव घेते, प्रेमभाव भक्तीने.
ताठ होतील माना, उंच होतील नजरा,
_____आणि _____कडून शिवरायांना मानाचा मुजरा.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास लिहायला, पुस्तके पडतील कमी,
________ला आयुष्यभर खुश ठेवण्याची, देतो मी हमी.
भगव्या झेंड्याची धमक बघ, मराठ्यांची आग आहे,
_____रावांचे नाव घेते______ घराण्याची शान आहे.
शब्द पडतील कमी, येवढी महाराजांची कीर्ती आहे,
______ रावांसोबत पतीच्या आधी, एक प्रेमळ मैत्री आहे.
कपाळी लावतो आम्ही, भगवा गंध,
_____आणि ______ला आहे शिवबांचा छंद.
छत्रपती शिवाजी महाराज, आमचे आदर्श आहेत,
_______ राव माझे सौभाग्य आहेत.
प्रत्येक मावळ्यांनी दिली, शिवबांना साथ,
______आणि______ ला सर्वांच्या आशीर्वादाने घ्या घरात.
शिवरायांचे मावळे आम्ही, नाही कुणाची भीती,
_____ आहे माझी, सौभाग्याची प्रीती.
शिवरायांच्या माथेवर, भवानी मातेचा हात,
________ रावांची अशीच असुदे, जन्मभर साथ.
मरण आले तरी चालेल, पण शरण जाणार नाही,
_____ च नाव घेतो, आयुष्यात कधी तुझी साथ सोडणार नाही.

You may also like

मराठी उखाणे

Marathi Ukhane For Female | स्त्रियांसाठी मराठी उखाणे.

Marathi Ukhane For Female आई बाबांच्या प्रेमापुढे, नाही कोणाची गरज, ________ रावांचे माझ्यावर प्रेम पाहताच, मी त्यांना होकार दिला सहज.
मराठी उखाणे

Best Marathi Ukhane For Bride | नवरीसाठी उखाणे.

Best Marathi Ukhane For Bride पिवळा पितांबर, श्रीकृष्णाच्या अंगावर घातला, _____ रावांच्या जीवनासाठी, स्त्री जन्म घेतला. स्वातंत्र्याच्या होमकुंडात, वीरांनी घेतली