Dadacha Lagin / दादाचं लगीन
मांडव दारात वराडी तोऱ्यात
निगाले बेगीनं निगाले बेगीनं
मांडव दारात वराडी तोऱ्यात
निगाले बेगीनं निगाले बेगीनं
हळदीच्या अंगान घराला झालिया
सुखाची लागन सुखाची लागन
मानाचे पानाचे ;आवतान धाडून
नात्याचे पुत्याचे; जमले झाडून
नटून करवली ; मायंदाळ चिलीपिली
दनानू द्या ; डीजे फिजे
धीत्तारा तित्तारा ढाकिन टिकीन
आमच्या दादाचं, माझ्या भावाचं,
माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,
माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन….
हळव्या मायेला , फुटंल पाझरं, भिजलं पदरं,
वाजत गाजत घराला झालीया सुखाची लागनं,
खराले आंदन सुखाचे गोंदनं
माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,
माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन….
ए म्हातारी कोतारी , शेजारी पाजारी, टेचात मैतंर
एताड पेताड , सोयरे धायरे समदेच हायपर
सफारी गगफारी घालून, नवरा मारीतो फॅशन
माझ्या भावाचं, माझ्या पुतन्याचं, माझ्या मित्राचं लगीन,
माझ्या दादाचं लगीन, माझ्या भावाचं लगीन
माझ्या पुतन्याचं लगीन, माझ्या दोस्ताचं लगीन….
आमच्या मुक्याचं लगीनं , आमच्या मुक्याचं लगीनं ,
आमच्या मुक्याचं लगीनं , आमच्या मुक्याचं लगीनं
गीत : माझ्या दादाचं लगीन
गीतकार : गुरु ठाकूर
गायक : नंदेश उमप
संगीत लेबल: Video Palace