De Dhakka Marathi Songs Music मराठी गाणी

De Dhakka title song lyrics || दे धक्का लिरिक्स

De Dhakka / दे धक्का

अंथरून पांघरून थंडीला घाबरून
फिरकीचा तांब्या न्याहारीला दशम्या
तहान लाडू भूक लाडू कांदा आणि चटणी
चुलीसाठी सरपण पेटवायला फुंकणी
चहापत्ती साखर गुल
टमरेल मंगुल

पाठीवरती बिर्हाड विंचवाचं चाललंय
पाठीवरती बिर्हाड विंचवाचं चाललंय

थांबायचं नाय गड्या थांबायचं नाय
घाबरायचं नाय आता घाबरायचं नाय
एक दोन।।।।।।। एक दोन थ्री फोर दे धक्का -दे धक्का
एक दोन थ्री फोर दे धक्का -दे धक्का

एक दोन थ्री फोर दे धक्का -दे धक्का

हलवून टाकू दुनिया सारी
हलवून टाकू दुनिया सारी

वाजवून डंका।।। जिंकून घेऊ दुनिया सारी
बस तू
बस तू

दे धक्का
दे धक्का
दे धक्का SSSSSS
दे धक्का

हि नार नखऱ्याची …नखऱ्याची चालतंय गाडी
हिला रस्त्याची …रस्त्याची भलतीच गोडी

हि नार नखऱ्याची …नखऱ्याची चालतंय गाडी
हिला रस्त्याची …रस्त्याची भलतीच गोडी

जाई धुळीला झटकत मटकत मटकत
वाट तिची अडवू नका

दे धक्का
दे धक्का
दे धक्का
दे धक्का

उतू नको मातु नको घेतला रस्ता टाकू नको
उतू नको मातु नको घेतला रस्ता टाकू नको

ग साजणी सये साजणी
ग साजणी सये साजणी

ग साजणी सये साजणी
ग साजणी सये साजणी

चल बाई चल पाऊल उचल मारायची हाय तुला मोठी मजल

चल बाई चल पाऊल उचल मारायची हाय तुला मोठी मजल

उतू नको मातु नको घेतला रस्ता टाकू नको
लांबचा पल्ला हाय गाठायचा अर्ध्या वाटी थकू नको

एईए दे धक्का
दे धक्का
एक दोन थ्री फोर दे धक्का -दे धक्का
एक दोन थ्री फोर दे धक्का -दे धक्का

वाट चालावी चालावी
वाट चालावी चालावी
रामाच्या पाराला इठुच्या नावानं
रामाच्या पाराला इठुच्या नावानं
वारी ची पालखी न्यावी

इमाने इतबारे करावा व्यवहार
देवाची किर्पा रहावी

वाट चालावी चालावी
वाट चालावी चालावी
वाट चालावी चालावी

दे धक्का ,दे धक्का ,दे धक्का हा
दे धक्का ,दे धक्का ,दे धक्का हा

गीत : दे धक्का
गीतकार : श्रीरंग गोडबोले , अभिजित देशपांडे
गायक : अजय गोगावले , कुणाल गांजावाला
संगीत लेबल: Zee Music Marathi

You may also like

भावगीत मराठी गाणी लता मंगेशकर सुरेश भट

Mendichya Panavar Marathi Lyrics || मेंदीच्या पानावर

Mendichya Panavar / मेंदीच्या पानावर मेंदीच्या पानावर मन अजून झूलते गंजाईच्या पाकळ्यांस दंव अजून सलते गं झुळझुळतो अंगणात तोच गार
चित्रगीत बालगीत मराठी गाणी राम कदम

A Aa Aai, M M Maka Marathi Lyrics || अ आ आई, म म मका

A Aa Aai, M M Maka / अ आ आई, म म मका अ आ आई, म म मकामी तुझा