चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लता मंगेशकर लावणी

De Re Kanha Choli Marathi Lyrics | दे रे कान्हा चोळी

De Re Kanha Choli / दे रे कान्हा चोळी अन्‌ लुगडी

अहो ऐका चतुरा अध्यात्माची कहाणी
किस्‍नाने भुलविल्या यमुनेवर गौळणी

ऐन दुपारी गौळण नारी आल्या यमुनेवरी
खुशाल सोडून दिल्या जळावर नक्षीच्या घागरी
वसने सुटली अलगद पडली ओल्या काठावरी
ठुमकत गोपी जळात शिरल्या उठली का शिरशिरी

गोपी न्हाण्यात होत्या दंग
तोच आला सखा श्रीरंग
गोळा करुन वस्‍त्रं सारी
बसला चढून कळंबावरी

नको न्याहाळू नितळ काया ओलेती उघडी
दे रे कान्हा, चोळी अन्‌ लुगडी

बालपणीची अल्लड नाती
मला कवळिले तू एकान्‍ती
अजून का तुज त्या खेळाच्या छंदाची आवडी?

ऐन वयाची किमया सारी
लाजवंति मी भोळि बावरी
कशि येऊ मी काठावरती मदनाची लालडी?

तूच दिली ही यौवनकांती
कशी लोचने आतुर होती
देहाहुन ही मुक्त भावना शरणागत बापुडी !

हात जोडिता बंधन तुटले
अता जिवाला मीपण कुठले?
आत्म्याने जणू परमात्म्याला अर्पण केली कुडी !

 

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: पिंजरा
गीत प्रकार: लावणी, चित्रगीत


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते