Deva Pudhe Manus Palapachola / देवापुढं माणूस पालापाचोळा
अरं आरं माणसा, तू येडा का खुळा रं?
देवापुढं माणूस पालापाचोळा रं
घडीभरी न्हाई कुनाचा भरोसा
तुला कोन देई मनाचा दिलासा?
वार्यावरी फिरतो हा जीव पांगळा रं
देवापुढं माणूस पालापाचोळा रं
सार्या दुनियेचा देव जन्मदाता
आम्ही बनवितो त्यास भगवंता
देवाघरी माणसाचा न्याय आंधळा रं
देवापुढं माणूस पालापाचोळा रं
मीठ-साखरेचं रूप जरी गोरं
एक होई गोड, एक होई खारं
दुधासंगं दोघांचा बी धर्म वेगळा रं
देवापुढं माणूस पालापाचोळा रं
नको अभिमान, नको ही निराशा
जल्माचा जुगार नशिबाचा फासा
हिम्मतीनं होई तुझा मार्ग मोकळा रं
देवापुढं माणूस पालापाचोळा रं
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: सुरेश वाडकर
चित्रपट: देवापुढं माणूस
गीत प्रकार: चित्रगीत