Dharani Aaichi Maya / धरणी आईची माया
धरणी आईची माया, कशी जाईल वाया?
लई दिवसानं, लई नवसानं, लागलंय आभाळ गाया
वैशाख वणवा सरला हो, मृगाचा पाऊस झरला हो
देवाची किरपा झाली, ही सुखांत काया न्हाली
झुळझुळ पानी पाटांत, सुख मावंना पोटात
फुलून काळिज आलं अन् हिरवं लेनं ल्यालं
घामाचं झालं मोती हो, लाखाची दौलत हातीं हो
खळ्यांत पडली रास आता सोन्याचा खाऊ घास
गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: बाळ पळसुले
स्वर: महेंद्र कपूर, आशा भोसले
चित्रपट: फटाकडी
गीत प्रकार: चित्रगीत