Dhund Madhumati Raat Re / धुंद मधुमती रात रे
धुंद मधुमती रात रे, नाथ रे,
तनमन नाचे, यौवन नाचे
उगवला रजनीचा, नाथ रे
जल लहरी या धीट धावती
हरित तटांचे ओठ चुंबिती
येइ प्रियकरा, येइ मंदिरा
अलि रमले कमलात रे, नाथ रे
ये रे ये का मग दूर उभा ?
ही घटिकाहि निसटुनी जायची
फुलतील लाखो तारा,
परि ही रात कधि कधि ना यायची
चषक सुधेचा ओठी लावुनि,
कटीभंवती धरि हात रे, नाथ रे
गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: मास्टर कृष्णराव
स्वर: लता मंगेशकर
चित्रपट: कीचकवध
गीत प्रकार: चित्रगीत