उषा मंगेशकर चित्रगीत जगदीश खेबूडकर मराठी गाणी राम कदम लावणी

Disala Ga Bai Disala Marathi Lyrics | दिसला ग बाई दिसला

Disala Ga Bai Disala / दिसला ग बाई दिसला

ज्वानीच्या आगीची मशाल हाती, आले मी अवसेच्या भयाण राती
काजवा उडं, किरकिर किडं, रानात सुरांत गाती
दिलाचा दिलवर, जिवाचा जिवलग कुठं दिसंना मला
ग बाई बाई, कुठं दिसंना मला
कुठं दिसंना, इथं दिसंना, तिथं दिसंना
शोधु कुठं, शोधु कुठं, शोधु कुठं?

दिसला ग बाई दिसला
मला बघून गालात हसला ग बाई हसला

गडी अंगानं उभा नि आडवा
त्याच्या रूपात गावरान गोडवा
तेजाळ मुखडा, सोन्याचा तुकडा
काळजामंदी ठसला, ग बाई बाई काळजामधी ठसला

माझ्या राजाचा न्यारा डौल
डाव्या डोळ्याचा देतोय्‌ कौल
लहरी पटका, मानेला झटका
भाला उरी घुसला, ग बाई बाई भाला उरी घुसला

अंगाअंगाची करते अदा
आग आगीवर झाली फिदा
उडंल भडका, चढंल धुंदी
जीव जीवात फसला गं बाई-बाई जीव जीवात फसला

गीत: जगदीश खेबूडकर
संगीत: राम कदम
स्वर: उषा मंगेशकर
चित्रपट: पिंजरा
गीत प्रकार: चित्रगीत, लावणी


You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते