मराठी विनोद

Doctor Patient Jokes in Marathi | डॉक्टर पेशंट मराठी जोक्स

Doctor Patient Jokes in Marathi

व्यस्त डॉक्टर

एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला…
थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला…
डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे,
असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला…
डॉक्टर (टेलिफोनवर) – नाही नाही, आज नको, उद्या दुपारी या…
मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला – हा, बोला काय समस्या आहे…?
तो माणूस – तुमचा टेलिफोन सुरु करण्यासाठी BSNL मधून आलोय…!!!
😂😂😂😂😂
औषध

डॉक्टर – तुम्हाला मलेरिया झाला आहे.
रुग्ण – डॉक्टर, खरच मलेरिया झालाय ना?
एकदा एकाला डॉक्टरांनी मलेरियाची औषधे दिलीत
पण तो टॉयफाईडने मेला…
डॉक्टर – नाही,
माझे रुग्ण मलेरियाचे औषध दिल्यावर मलेरियानेच मरतात…!!!
😂😂😂😂😂
ऑपरेशन

डॉक्टर – घाबरू नका देशपांडे…
खूप छोटे ऑपरेशन आहे…

पेशंट – धन्यवाद डॉक्टर… पण
माझे नाव देशपांडे नाही…!

डॉक्टर – देशपांडे तुमचे नाही,
माझे नाव आहे…!!!
😂😂😂😂😂
चावी

एक गृहस्थ आपल्या चार वर्षांच्या मुलाला डॉक्टरकडे घेऊन गेले व म्हणाले,

गृहस्थ – माझ्या मुलाने चावी गिळली आहे…
डॉक्टर – त्याने चावी गिळून किती वेळ झाला?
गृहस्थ – दहा दिवस झाले असतील.
डॉक्टर – काय? दहा दिवस …इतक्या दिवसांनंतर माझ्याकडे आणताय?
गृहस्थ – इतके दिवस आमच्याकडे डुप्लिकेट चावी होती, आजच हरवली.
😂😂😂😂😂
रिचेकिंग

डॉक्टर (इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला) – तुमची 1 किडनी फेल झाली आहे.

विद्यार्थी आधी खूप खूप रडला…., मग डोळे पुसत बोलला…
.
.
.
.
RECHECKING मध्ये निघेल का??”
😂😂😂😂😂
टाके

एका माणसाला डॉक्टर साहेबांची मजा घ्यायची हुक्की येते. तो दवाखान्यात जातो.

माणूस – डॉक्टरसाहेब, तुम्हाला टाके घालता येतात का?

डॉक्टर – हो येतात की… कशाला घालायचे आहेत?

माणूस – ही घ्या चप्पल. हिचा बंद तुटलाय, जरा टाके घालून द्या.

डॉक्टर – निघ… xxxxxxxxxxxxx
😂😂😂😂😂
रोगमुक्त

पेशेंट एका ऑपेरेशन नंतर,

पेशेंट – डॉक्टर साहेब आता मी रोगमुक्त झालो आहे ना…

उत्तर मिळाले,

भावा डॉक्टर तर खालीच राहिलेत मी तर चित्रगुप्त आहे…!!!
😂😂😂😂😂
चिंता

डॉक्टर – आता कसं वाटत आहे तुम्हाला?

पेशंट – तुम्ही दिलेल्या औषधाने फरक पडत आहे,
परंतु कधी कधी जीव घाबरल्यासारखा होतो…!

डॉक्टर – चिंता नका करू…
औषध दिले आहे, तो पण जाईल.

नसेल समजले तर परत वाचा…
😂😂😂😂😂
चोरी

नंदू – तुम्ही तर माझे हृदय चोरलेत डॉक्टर
I love you…!!!

लेडी डॉक्टर – अहो, चुकलात तुम्ही,
आम्ही तर तुमची किडनी चोरली आहे.
😂😂😂😂😂
त्रास

डॉक्टर – या पुर्वी तुम्हाला स्पॅांडिलायसिसचा त्रास झाला होता का?

पेशंट – हो खुप पुर्वी….

डॉक्टर – कधी?

पेशंट – शाळेत सरांनी स्पॅांडीलायसिसचे स्पेलिंग विचारले होते तेव्हा…!
😂😂😂😂😂
तहान

एक रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल होतो.
नर्स त्याला प्रथमोपचार देण्यासाठी येते.

रुग्ण – अहो सिस्टर, मला जरा पाणी द्या हो प्यायला…

नर्स – काय तहान लागली आहे का?

रुग्ण – (वैतागून) नाही… गळा लिकेज आहे का ते बघायचंय…!!!
😂😂😂😂😂
स्लो पॉईजन

डॉक्टर – तुम्हाला माहिती आहे का,
सिगारेट एका प्रकारे स्लो पॉईजनचे काम करते…

चंदू काका – अहो डॉक्टर साहेब,
मला कुठे मारायची घाई आहे…!!!
😂😂😂😂😂
कसं आठवू

एक गरोदर बाई डॉक्टरकडे जाते,

डॉक्टर – कितवा महिना?

बाई – आठवा…

डॉक्टर – इश्श… मी कसा आठवू…!
😂😂😂😂😂
चष्मा

पेशंट – डॉक्टर मी चष्मा वापरणे चालू केल्यावर
मला वाचता येईल ना…!

डॉक्टर – हो, नक्की…

पेशंट – धन्यवाद, डॉक्टर साहेब…
तुम्ही या अडाणी माणसाची दुनिया बदलून टाकली.
😂😂😂😂😂
ऑपरेशन

डॉक्टर ऑपरेशन थिएटरबाहेर येऊन सांगतात,

‘सुरज, तुझ्या मुलीला आम्ही वाचवू शकलो नाही.

हे ऐकताच तो माणूस 100 मजली इमारतीवरून खाली उडी मारतो.

50 व्या मजल्याजवळ
येताच तो माणूस विचार करतो की,
‘मला तर मुलगीच नाही.’

जेंव्हा तो 25 व्या मजल्याजवळ येतो,
तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
‘माझे तर अजून लग्नच झाले नाही.’

आणि

जेंव्हा तो 10 व्या मजल्याजवळ
येतो तेंव्हा त्याच्या लक्षात येते की,
‘मी सुरज नसून नीरज आहे.‘
😂😂😂😂😂
सल्ला

एका चॅनेलवर एका कार्यक्रमात विचारलेला प्रश्न :-
मुलगी – माझं वय अठरा वर्षे आहे.
माझा रंग गोरा आहे.
माझी त्वचा खुप मुलायम आणि नाजुक आहे.
मी रात्री काय लावुन झोपू?
.
.
.
.
डॉक्टरांचा सल्ला – दाराची कडी.
😂😂😂😂😂
मच्छर

मोलकरिण – बाईसाहेब तुमच्या मुलाने मच्छर खाल्ले…
.
.
.
बाईसाहेब – माझ तोंड काय बघतेस डॉक्टरला बोलाव…
.
.
.
मोलकरिण – आता घाबरण्याचे कारण नाही बाईसाहेब…
.
.
.
मी त्याला All Out पाजले आहे…!!!
😂😂😂😂😂
सिटी स्कॅन
 
मुलगी – डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय…
.
.
.
डॉक्टर – मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल…
.
.
.
मुलगी – पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज आहे डॉक्टर…!!!

डॉक्टरने डिग्री विकायला काढलीये…!!!
😂😂😂😂😂
अविश्वास

मुलगी – प्लीज, डॉक्टर माझ्या प्रियकराला आत
बोलवा ना…!

डॉक्टर – माझ्यावर भरोसा ठेवा,
मी एक चांगला डॉक्टर आहे…
मी तसलं काही करणार नाही…

मुलगी – अहो, तसं काही नाही डॉक्टर…
तुमची नर्स बाहेर एकटी आहे,
आणि त्या xxxxxxxxxxx वर माझा
अजिबात विश्वास नाहीये…!
😂😂😂😂😂
पेग

डॉक्टर – कस येण केलं?

झंप्या – तब्येत ठीक न्हवती ओ… छातीत दुखत होत…

डॉक्टर – दारू पिता का?

झंप्या – हो.. पण 1 च पेग बनवा…

डॉक्टर – निघ इथून, xxxxxxxxxx
😂😂😂😂😂
विश्रांती

डॉक्टर – तुमच्या पतीस विश्रांतीची गरज आहे.
मी झोपेच्या गोळ्या लिहुन देतो.

पेशंटची पत्नी – किती वेळा देऊ.

डॉक्टर – देऊ नका. तुम्ही घ्यायच्यात…!!!
😂😂😂😂😂
ब्रॅण्ड

डॉक्टर – आपण कोणता साबण वापरता?
गण्या – पांडुरंगाचा लिंबाचा साबण…
डॉक्टर – कोणती पेस्ट वापरता?
गण्या – पांडुरंगाची आयुर्वेदिक पेस्ट
डॉक्टर – शॅम्पू?
गण्या – पांडुरंगाचा हर्बल शैम्पू..
डॉक्टर – हेयर ऑईल?
गण्या – पांडुरंगाच आवळ्याच तेल…
डॉक्टर – हे पांडुरंग मल्टीनॅशनल कंपनी ब्रॅण्ड आहे की पॉप्युलर लोकल ब्रॅण्ड आहे?
गण्या – नाही… तसं काही डॉक्टर, पांडुरंग माझा रूम पार्टनर आहे.
😂😂😂😂😂
जबरदस्ती

डॉक्टर – तुम्ही पेशंटला 1 तासापूर्वी
घेऊन आला असता तर आम्ही त्याला
वाचवू शकलो असतो.

गंप्या – अहो, डॉक्टर
20 मिनिटांपूर्वी या व्यक्तीचा अपघात झालाय,
1 तासापूर्वी जबरदस्तीने आणायला पाहिजे होते का…!
😂😂😂😂😂
विश्रांती

डॉक्टरने चारूला तपासून सांगितले की,
तिला कोणताच आजार झालेला नसून
फक्त विश्रांतीची गरज आहे.

त्यावर चारू म्हणाली, पण डॉक्टर तुम्ही माझी जीभ तर तपासलीच नाही.

डॉक्टर म्हणाले, तिलादेखील विश्रांतीची गरज आहे.
😂😂😂😂😂
बघण्याची वेळ

लेडी डॉक्टर – काय हो तुम्ही रोज सकाळी माझ्या
क्लिनिकसमोर उभे राहून स्रियांना का बघत असता?

गण्या – अहो तुम्हीच तिथे लिहले आहे ना,
स्रियांना बघण्याची वेळ 9.30 ते 11.30
😂😂😂😂😂
स्मित हास्य

डॉक्टर – (चिमणरावांना) मी माझ्या देखण्या नर्सला
कामावरून काढून टाकले आहे.

चिमणराव – का हो, तिने असा काय गुन्हा केला?

डॉक्टर – अहो मी माझ्या अनेक रोग्यांना परस्परात बोलताना ऐकलेकी,
तिच्या गोड स्मित हास्याने त्यांचे अर्धे रोग बरे होतात.
😂😂😂😂😂
प्लास्टिक सर्जरी

स्थळ – पुण्याशिवाय दुसरे कोणते असूच शकत नाही.

पेशंट – डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे!
साधारण किती खर्च येईल?

डॉक्टर – 3 लाख रुपये.

पेशंट (थोडा विचार करून) – …आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?

डॉक्टर – निघ… xxxxxxxxxx
😂😂😂😂😂
क्रिकेट

पेशंट – डॉक्टर… जेव्हा मी झोपतो तेव्हा
माझ्या स्वप्नात येऊन माकडं क्रिकेट खेळतात…

डॉक्टर – हे औषध घ्या.. आज रात्री झोपण्यापूर्वी खाऊन झोपा…

पेशंट – उद्या पासून खातो डॉक्टर साहेब…

डॉक्टर – का?

पेशंट – आज त्यांची फायनल मॅच आहे

डॉक्टर अजून बेशुद्ध आहेत …
😂😂😂😂😂
सही

पेशंट – डॉक्टर, तुम्ही दिलेलं औषध कुठेच मिळालं नाही.

डॉक्टर – अरेच्चा… मी औषधाच नावच लिहायला विसरलो…
हि तर माझी सही आहे…!
😂😂😂😂😂
झोप
 
डॉक्टर – बोला काय त्रास आहे?

पेशंट – झोप खूप येते…नेहमी झोपतच असते मी.

डॉक्टर – कोणता मोबाईल वापरता आपण..?

पेशंट – Nokia 1100!

डॉक्टर – एक स्मार्ट फोन लिहून देतो, त्यात Jio sim टाकून
Facebook, Whatsaap
आणि
काही games install करा,
सगळं ठीक होईल..!
😂😂😂😂😂
नकार

डॉक्टर – तुझे तीन दात कसे तुटले ?

रुग्ण – बायकोने दगडासारखी भाकरी तयार केली होती.

डॉक्टर – मग खायला नकार द्यायचा होता.

रुग्ण – तेच तर केले होते…!
😂😂😂😂😂
व्यायाम

डॉक्टर – हे बघा, तुमची तब्येत सुधरायची असेल तर तुम्ही व्यायाम केला पाहिजे…

एक काम करा तुम्ही रोज कुठलातरी खेळ खेळायला सुरवात करा…

गंपू – डॉक्टर , मी तर रोज क्रिकेट आणि टेनिस खेळतो…

डॉक्टर – अरे वा… किती वेळ खेळता?

गंपू – जोपर्यंत मोबाइलचं चार्जिंग असतं तोपर्यंत…!!!
😂😂😂😂😂
बाहेरचे जेवण

चिंटू – डॉक्टर, कालपासून पोटात दुखतय…

डॉक्टर – बाहेरचे काही खाता का…?

चिंटू – हो…

डॉक्टर – बाहेर काही खाऊ नका…

चिंटू – ठीक आहे डॉक्टर,
पार्सल घेऊन येत जाईन…!!!
😂😂😂😂😂
ड्रिंक 

डॉक्टर (पेशंटला) – मी तुमचा प्रोब्लेम सांगू नाही शकत,
परंतु
बहुतेक हे ड्रिंकमुळे होत असेल…!

पेशंट – ठीक आहे डॉक्टर,
तुमची उतरल्यावर परत येतो…!!!
😂😂😂😂😂
विचित्र आजार

पेशंट – डॉक्टर, मला एक विचित्र आजार झालायं…

डॉक्टर – काय होतंय तुम्हाला?

पेशंट – मला जेवणानंतर भूक लागत नाही,
सकाळी उठल्यावर झोप लागत नाही,
काम केल्यावर थकवा येतो…!
काय करू ?

डॉक्टर – रोज रात्री उन्हात बसा…!!!
😂😂😂😂😂
गाडी भाडे

एक माणूस रात्री 2 वाजता दारू पिऊन,
डॉक्टरच्या घरी जातो आणि डॉक्टरला उठवून विचारतो…

डॉक्टर साहेब, घरी यायचे तुम्ही किती घेता…?

डॉक्टर – 500 रु. फक्त…

माणूस – चला मग डॉक्टर, पटकन…

डॉक्टर गाडी काढतात आणि
दोघेजण त्या माणसाच्या घराकडे निघतात…

माणूस – डॉक्टर साहेब, थांबा इथे… माझे घर आले…

डॉक्टर – ठीक आहे, पेशंट कुठे आहे…?

माणूस – अहो कुठला पेशंट…!
रात्री रिक्षावाले घरी जाण्याचे 1000 रु. मागत होते…!
हे घ्या तुमचे 500 रु.
😂😂😂😂😂
पोस्टमार्टम

डॉक्टर – बाई, तुमच्या नवऱ्याच्या सगळ्या टेस्ट झाल्यात
आणि
सगळेच रिपोर्ट नॉर्मल आले आहेत…
काही कळतच नाहीये,
यांना नेमकं काय झालंय ते…?

बाई (काळजीच्या सुरात) – अहो डॉक्टर साहेब, ते
पोस्ट मार्टम का काय असत, ते तरी करून पहा एकदा…!!!

पेशंट फरार आहे…
😂😂😂😂😂

You may also like

मराठी विनोद

Marathi Jokes for Friends | मित्र-मैत्रिणीवर मराठी जोक्स

Marathi Jokes for Friends पिकनिक एक मित्र आपल्या पिकनिकसाठी मित्रांना स्मशानभूमीत घेऊन जातो… सगळे मित्र – ऐ आम्हाला कुठ घेऊन
मराठी विनोद

Husband Wife Jokes in Marathi | नवरा-बायको मराठी जोक्स

Husband Wife Jokes in Marathi बायको – तुम्ही मला लग्नापूर्वी सिनेमा, सारसबाग, कुठे कुठे फिरायला घेऊन जायचा… आणि आता कुठेच