आशा भोसले ग. दि. माडगूळकर चित्रगीत पु. ल. देशपांडे मराठी गाणी

Dur Kuthe Raulat Darvalato Marathi Lyrics | दूर कुठे राउळात दरवळतो

Dur Kuthe Raulat Darvalato / ​दूर कुठे राउळात दरवळतो

दूर कुठे राउळात दरवळतो पूरिया !
सांजसमयी दुखवितात अंतरास सूर या !

असह्य एकलेपणा, आस आंसवी मिळे
काय अंतरात ते अजून ना कुणा कळे
झाकळून जाय गाव, ये तमास पूर या !

दूर वास रे तुझा, ध्यास लागला मनी
दृष्टिभेटही नसे काय सांगणे जनी
एकवार तूच ये सखीस धीर द्यावया !

सलत सूर सनईचा वारियात कापरा
सुकून पाकळी मिटे मूक भाव लाजरा
फुलांत गंध कोंदला, वाट ना उरे तया !

गीत: ग. दि. माडगूळकर
संगीत: पु. ल. देशपांडे
स्वर: आशा भोसले
चित्रपट: अंमलदार
गीत प्रकार: चित्रगीत

You may also like

आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी (Dehachi Tijori Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते
आम्ही जातो अमुच्या गावा चित्रगीत जगदीश खेबूडकर नट भक्तीगीत भूप राग सुधीर फडके

देहाची तिजोरी – उघड दार देवा (Dehachi Tijori – Ughad Dar Deva Lyrics)

देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवादेहाची तिजोरी भक्तीचाच ठेवाउघड दार देवा आता उघड दार देवाउघड दार देवा आता उघड दार देवा पिते